पुणे – गणेशोत्सव ही पुण्याने राज्याला नव्हे देशाला दिलेली सांस्कृतिक भेट आहे. पण या सार्वजनिक गणेश मंडळाच्या परवानगीसाठी कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी धावाधाव करावी लागते त्यामुळे गणेश मंडळाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबावण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.
गणेशोत्सवात मंडप घालण्यापासून परवानगीचा ससेमीरा कार्यकर्त्यांच्या मागे लागतो. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक अशा अनेक कार्यक्रमाच्या परवानगी मिळवताना कार्यकर्ते थकून जातात. प्रत्येक ठिकाणी त्यांना साऱ्या प्रश्नावलीला सामोरे जावे लागते. या कार्यकर्त्यांच्या अडचणींना कार्यकर्ते पद अभिमानाने मिरवणाऱ्या आमदार रवींद्र धंगेकर यांनी वाचा फोडली.
महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्ताकडे त्यांनी ही लेखी मागणी केली. याबाबत धंगेकर माध्यमाना म्हणाले, गणेश मंडळे ही कार्यकर्त्यांची खाण आहे. पुण्याचे भावाविश्व या उत्सवशी निगडित आहे. त्याचे खरे मानकरी हे सामान्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी करणे हे प्रशासनाचे कामच आहे. या मागणीची तें गंभीर्याने दखल घेतील असा विश्वास आहे, अन्यथा त्यासाठी आमचे सनदशीर मार्ग वापरावे लागतील.