मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा लेगस्पीनर ॲडम झम्पावर मैदानात एका सहकारी खेळाडूला उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे एका सामन्याची बंदी लावण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी झम्पाला या बाबत अवगत करत ही कारवाई केली.
झम्पा हा सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. यावेळी मेलबर्न आणि सिडनी या दोन संघांमध्ये सामना सुरु होता. झम्पा हा मेलबर्नकडून खेळत होता आणि सिडनीचा संघ फलंदाज करत होता. यावेळी 16 व्या षटकात झाम्पाच्या गोलंदाजीवर सिडनीच्या कॅलम फर्ग्युसनने एक फटका मारला आणि तो एक धाव घेण्यासाठी धावला. त्यावेळी मेलबर्नच्या संघातील एका खेळाडूकडून हा चेंडू सुटला आणि सिडनीला चौकार मिळाला. त्यानंतर झम्पा चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.
यानंतर झम्पाने भर मैदानातच त्याला अपशब्दांची लखोली वाहिली. त्यामुळेच झम्पावर ही कारवाई करण्यात आली. झम्पाने या सामन्यात गोलंदाजी करताना 49 धावा देत तीन बळी घेतले. त्याच्यावर कारवाई झाल्याने आता बिग बॅश लीगमधील पुढचा सामना त्याला खेळता येणार नाही.