औंध वार्ताहर
येत्या एक वर्षात एक लाख कुटुंबांना सिलेंडर मुक्त करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. व एक लाख कुटुंबांना येत्या एक वर्षात सिलेंडर मुक्त करणार असे बाणेर येथील ऑर्किड टॉवर सोसायटी येथे एम एन जि एल सेवेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की सिलेंडर मुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. एम एन जि एल हा नैसर्गिक वायू आहे तसेच हा वायू जमिनीवर पसरतो यामुळे अपघाताचा धोका नाही. तसेच सिलेंडर संपल्या मुळे दुसरा सिलेंडर येईपर्यंत नागरिकांना जो त्रास होतो त्यापासून या एमजीएमच्या लाईन मुळे मुक्तता होणार आहे. हा वायू नैसर्गिक असल्यामुळे यापासून प्रदूषण देखील होत नाही व तो अत्यंत सुरक्षित आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे खासदार गिरीश बापट म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी एम एन जि एल कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत एम एन जि एल कनेक्शन जोडल्यामुळे होणारे फायदे नागरिकांना सांगितले. तसेच बाणेर बालेवाडी परिसरातील एकूण एकशे आठ सोसायट्यांत पर्यंत हे एम एन जि एल चे कनेक्शन पोहोचवण्यात आले आहे याची माहिती दिली नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या लाईन साठी खास करून पुढाकार घेऊन लवकरात लवकर ही एम एन जि एल लाईन सोसायटीमध्ये आणल्याबद्दल ऑर्किड टॉवर सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच अमोल बालवडकर यांच्या हस्ते गॅस शेगडी चालू करून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, व नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांचेदेखील सोसायटीतर्फे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी स्वीकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, भाजप शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, भाजप उपाध्यक्ष पुणे शहर राहुल कोकाटे तसेच एम एन जि एल कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, व ऑर्किड टॉवर सोसायटीचे नागरिक उपस्थित होते.