भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह “एक लाख का लेहंगा’ हे नवे गाणे लवकरच रिलीज करणार आहे. या गाण्याचा टीजर युट्यूबवर रिलीज झाला आहे. अक्षराने या गाण्याविषयीची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे. अक्षरा ही लोकप्रिय अभिनेत्री आपल्या सुरेल आवाजासाठीही ओळखली जाते. अक्षराने आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी हे गाणे आणले आहे. या गाण्याच्या माध्यमातून अक्षरा लवकरच प्रेक्षकांमध्ये धमाल उडवणार आहे. या गाण्यात अक्षरा सिंह लेहंगा परिधान करुन झळकणार असून टीझरमध्ये तिचा लूक खूप छान दिसत आहे.
या गाण्याला अक्षरानेच आवाज दिलेला असून गीतरचना पंकज यांनी केलेली आहे. विनय विनायक यांनी या गाण्याला संगीत दिलेले आहे. या गाण्याचा टीजर सोनी म्युझिक रिजनलने शेअर केला आहे. अक्षरा सिंह लवकरच “डोली’ या भोजपुरी चित्रपटात झळकणार आहे.
मंजुळ ठाकूर दिग्दर्शित या चित्रपटात रितेश पांडेय, विपिन सिंह, नीलिमा सिंह, निशा पांडे, रश्मि श्रीवास्तव, नरेश सिंह आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. निर्मात्यांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली झाली. पण सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अक्षराच्या “इश्क’ या भोजपुरी चित्रपटाचा लोक आनंद घेताना दिसत आहेत.