लष्करहद्दीतून निकामी बॉम्ब म्हणून फोडण्याच्या प्रयत्नात झाला स्फोट
नगर – तालुक्यातील खारेकर्जुने येथे येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास के. के. रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करीत असताना त्याचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला. भाऊ साहदू गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. के.के. रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडविण्याचा सराव चालतो. निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्त केली आहे.
मात्र खारेकर्जुने येथील काही लोक ठेकेदारांची नजर चुकून सराव संपल्यानंतर परिसरातील काही लोक येथे निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात. हद्दीमध्ये शिरून हे बॉम्बचे भंगार साहित्य गोळा करण्याचा प्रकार कायमच सुरु असतो. त्याप्रमाणे येथील एक तरुण निकामी झालेले बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी गेले होता.
तेथे त्यांना भरलेला बॉम्ब सापडला. तो त्यांनी माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या बॉम्बचा स्फोटझाल्याने त्यात एक तरुण ठार झाल्या. यापूर्वीही अशा घटना येथे घडल्या आहेत. के.के. रेंजच्या हद्दीत अनेकजण अनाधिकृत प्रवेश करून लष्कराने फोडलेल्या बॉम्बमधील सिसे गोळा करून ते भंगारात विकतात त्यामधून चांगले पैसे मिळत असल्याच्या मोहापाई सरावाच्या ठिकानावरून निकामी बॉम्प गोळाकरून त्यामधील सिसे काडून भंगारात विकतात. मात्र अनेक वेळा काही बॉम्ब निकामी न झाल्याने अशा घटना अनेक वेळा घडल्या असून अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.