सणसवाडी- सणसवाडी (ता. शिरूर) येथे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवित दुचाकीला ठोस देऊन दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी एकाला सहा महिने सक्षम कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
केशव सोमनाथ शिवले (रा. तुळापूर, ता. हवेली), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सणसवाडी येथून दुचाकीचालक राजेंद्र ज्ञानेश्वर दरवडे व त्यांची पत्नी भामाबाई ज्ञानेश्वर दरवडे हे दोघे दुचाकीहून जात असताना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कार चालकाची त्यांना जोरदार धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीचालक ज्ञानेश्वर दरवडे यांचा मृत्यू झाला होता. भामाबाई दरवडे गंभीर जखमी झाल्या होत्या. याबाबत सिद्धेश्वर व्यंकटराव बिराजदार (रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
शिक्रापूर पोलिसांनी कार चालक केशव सोमनाथ शिवले (रा. तुळापूर, ता. हवेली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले हे करत असताना त्यांनी योग्य पद्धतीने तपास करीत गुन्ह्याचे पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्यांनतर न्यायालयाने योग्य साक्षीदार तपासात शिरूर न्यायालयाचे न्यायाधीश पी. के. करवंदे व सरकारी अभियोक्ता एस. एन आरणे यांनी आरोपी केशव सोमनाथ शिवले यास दोषी ठरवून सहा महिने सक्षम कारावास व चार हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.