मंचर- एक हात मदतीचा या संकल्पनेतून मंचर (ता. आंबेगाव) येथील हातावर पोट असणाऱ्या आणि रेशनकार्ड नसलेल्या 206 गरीब आणि गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूनचे वाटप करण्यात आले, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली. मंचर शहरातील हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती.
अशा 206 कुटुंबासाठी (रेशनकार्ड नसेलल्या) जीवनावश्यक किराणा व इतर वस्तूंचे 10 दिवस पुरेल असे वाटप केले आहे. मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्या आपणही एक मदतीचा हात होऊ शकता या संकल्पनेतून मोफत जीवनावश्यक वस्तू वाटप योजना तयार केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी दिली.