जळोची -शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी येथे गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल 1 लाख 46 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अलका शशिकांत पवार (रा. इंद्रायणीनगर, पिंपळी ता. बारामती) यांच्यासह दारूसाठी कच्चामाल देणाऱ्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बारामती-इंदापूर रोडवरील पिंपळी गावच्या हद्दीत कॅनॉललगत असणाऱ्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला असता हातभट्टीची दारू, रसायन व दारूचे साहित्य मिळून आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस फौजदार संदीप गोसावी, सुरेश भोई, तानाजी गावडे, संदेश ओमासे, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लाळगे, शरद गावडे, जयश्री गवळी, लता हिंगणे यांनी केली.