भवानीनगर -बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूविक्री करणाऱ्या एकूण अकराजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 1 लाख 31 हजार 813 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेतील अकराजणांवर तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.
पोलीस निरीक्षक घोलप यांना मिळालेल्या माहितीवरून दारू विक्री करणारे आरोपी शुभम संजय शिंदे (रा. पारवडी), अलका रामचंद्र दुबळे (रा. तांदूळवाडी), गीताबाई अशोक अडागळे (रा. तांदूळवाडी), चेतन बाळू जाधव (रा. माळेगाव), रोहिदास रामदास मदने (रा. घाडगेवाडी), नाना कुंडलिक सोनवणे (रा. झारगरवाडी), आकाश दादासाहेब देवकाते (रा. निरावागज), वसंत दत्तात्रय गोफणे (रा. सोनगाव), विजय जनार्धन पवार (रा. माळेगाव बुद्रुक) बाळासाहेब अनिल सावत (रा.माळेगाव), दीपाली भिसे (रा. कटफळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून 133 लिटर गावठी दारू, 5 लिटर देशी- विदेशी दारू तसेच गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य, असा एकूण 1 लाख 31 हजार 813 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.