मुंबई – देशातला सर्वात मोठा रिऍलिटी शो ठरलेला “कौन बनेगा करोडपती’ पुन्हा सुरू होणार आहे. बॉलीवूडचे शहंशाह, बिग बी, मेगा स्टार अमिताभ बच्चन हा रिऍलिटी कॉम्पिटिशन शो घेऊन येणार आहेत. या क्वीझ शो ची जाहिरात सध्या जोरात सुरू झाली आहे.
या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन प्रेक्षकांना उद्देशून “आपण कधी आपण स्वतः आणि आपल्या स्वप्नांमधील अंतराबद्दल विचार केला आहे का? फक्त तीन अक्षरे, प्रयत्न करा. तर, आपली स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी फोन उचलून तयार व्हा कारण केबीसी 13 ची नोंदणी 10 मेपासून सुरू होत आहे.’ असे म्हणताना दिसतात.
“केबीसी-12′ सीजनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच आता “केबीसी-13’ची तयारी केली गेली आहे. गेल्या वर्षी झालेल्या “केबीसी’ च्या 12 व्या सीजनप्रमाणे करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे “केबीसी’चा 13 वा सीजन देखील जुलैऐवजी ऑगस्टमध्ये रिलीज केला जाऊ शकतो.
आणखीन काही दिवस तरी हे शुटिंग सुरू होण्याची शक्यता नाही. गेल्यावेळप्रमाणे याही वेळी सेट वर प्रेक्षक असणार नाहीत. त्यामुळे ऑडियन्स पोल या लाईफलाईनऐवजी व्हिडिओ कॉल अ फ्रेन्ड ही लाईफलाईन असणार आहे.