Baramati RTO – बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ जागतिक स्मरण दिन हा उपक्रम राबविण्यात आला..या उपक्रमामध्ये अपघात ग्रस्त व्यक्तींना सहानुभूतीपूर्वक मदत मिळणे गरजेचे असते.आजवर झालेल्या अपघात ग्रस्त व्यक्तींची व त्यांच्या कुटुंबियांची झालेली वाताहात विचारात घेऊन वाहन चालकांना रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबतच्या प्रतिज्ञाचे यावेळी वाचन करण्यात आले.
दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी उपस्थित वाहन चालकांना रस्ता सुरक्षेची शपथ देऊन मार्गदर्शन केले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक निरंजन पुनसे,चंद्रमोहन साळोखे,हेमंतकुमार सोलनकर, रुपेश गायकवाड,जयवंत पोळ व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला झालेल्या दुःखाकडे लक्ष वेधणे व अशा कुटुंबाला आधार मिळावा म्हणून जागतिक स्मरण दिन या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली. अपघातग्रस्तांच्या अडचणींची दखल घेणे. हा हेतू जागतिक स्मरण दिनाचे मूळ उद्दिष्ट असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितले.