कलेढोण, (वार्ताहर) – माघी वारीनिमित्त तरसवाडी घाटात भरला द्राक्ष बाजारहोता. माघी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेस जाणार्या वारकर्यांची पंढरपूर-मल्हारपेठ रस्त्यावर वर्दळ असते. कोकण आणि पश्चिम भागातील अनेक गावांमधून या वारीसाठी असंख्य वारकरी पंढरपूरला जातात.
द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे कलेढोण गाव तरसवाडी घाटाच्या पायथ्याशी आहे. माघ महिन्यातील एकादशीला वारकर्यांचा उपवास असतो. उपवासाला बहुतांश वारकरी फळांचे सेवन करतात. त्यात द्राक्ष हा चांगला पर्याय असल्याने वारकर्यांना येथील द्राक्षे भुरळ घालतात.