मुंबई – भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित मानले जात आहे. आता तर एकनाथ खडसे आज २२ तारखेला सीमोल्लंघन करणार असल्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे २२ तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? यावर प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
याआधीही फणवीसांनी म्हंटले कि, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगलं कळतं. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे, असे वक्तव्य केले होते.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवणार, तसेच खडसे यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये कृषिमंत्रीपद मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.