कोल्हापूर – कोल्हापूरमधील क्वारंटाइन सेंटरमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये काही लोकांनी बिसलेरी बॉटलच्या बॉक्समधून दारुच्या बाटल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर संबंधित व्यक्तींना केवळ तोंडी समज देऊन सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात अनेक ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. अशाच एका क्वारंटाइन सेंटरमध्ये शनिवारी रात्री काही व्यक्तींनी दारुची पार्टी केली. या सर्वांना बिसलेरी बॉटलच्या बॉक्समधून दारुच्या बाटल्या आणि नातेवाईंकडून मटण पोहोचवण्यात आले. त्यानंतर थाटामाटात या ठिकाणी दारुची पार्टी पार पडली. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.
या ठिकाणी काही दिवसांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असाच प्रकार घडला होता. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रातही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात चाललेल्या पार्टी आणि त्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.