OIC On Ram Mandir Inauguration : संपूर्ण देश 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे भव्य उद्घाटन सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणात दंग झाला होता. देशातच नव्हे तर परदेशातही जोरदार चर्चा झाली. मात्र, अनेकांना राम मंदिराच्या उद्घाटनाच आनंद पचला नसल्याचे दिसत आहे. कारण पाकिस्तानने यापूर्वीच राम मंदिराच्या निर्माणावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता त्यात नव्या नावाची भर पडली आहे. यावेळी 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) या विषयी प्रक्षोभक वक्तव्य करत विष पेरले आहे.
ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर राम मंदिराच्या अभिषेकावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. इस्लाम धर्माची बाबरी मशीद पाडून बांधलेल्या राम मंदिराचा आम्ही निषेध करतो, असे निवेदन त्यांनी जारी केले. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी राम मंदिर बांधले गेले आहे, तेथे गेल्या 500 वर्षांपासून बाबरी मशीद होती. यावर ओआयसीने राम मंदिराच्या उद्घाटनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
#OIC General Secretariat Denounces Opening of “Ram Temple” on Demolished Historic #BabriMosque in the #Indian city of #Ayodhya: https://t.co/lT3UYXsyqX pic.twitter.com/sU7N800Ae9
— OIC (@OIC_OCI) January 23, 2024
पाकिस्ताननंतर ओआयसीचे विधान
भारताचा शेजारी आणि पारंपरिक शत्रू असणारा देश पाकिस्ताननेही राम मंदिराच्या निर्माणावर वक्तव्य केले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले आहे ते चुकीचे आहे, असे वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले होते.
भारतातील कारसेवकांनी 1992 साली बाबरी मशीद पाडली होती, जी कोणत्याही प्रकारे योग्य नव्हती. दुसरीकडे पाकिस्ताननंतर आता राम मंदिराबाबत ओआयसीला दिलेले वक्तव्य चर्चेत आहे. ओआयसीचे सरचिटणीस हिसेन इब्राहिम ताहा यांचा हवाला देत ओआयसी म्हणाले की, बाबरी मशीद पाडून मंदिर बांधणे ही गंभीर चिंतेची बाब आहे.
ओआयसीने भारताशी संबंधित कोणत्याही अंतर्गत मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी भारत सरकारने कलम 370 आणि 35A हटवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती आणि हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राम मंदिराबाबत अशी विधाने समोर आली आहेत.