मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा; धावती कार पेटली!

पेण – मुबंई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळ दरम्यान रामवाडी पुलावर वडखळ कडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. मात्र सुदैवाने कारमध्ये बसलेल्या सर्व चारही प्रवाशांना कारला आग लागल्याचे कळताच, ते तत्काळ कारमधून बाहेर पडल्याने अनर्थ टळला.

या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही, सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
पेण नगरपालीका फायर ब्रिगेड घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग आटोक्‍यात आणली.

पेण पोलिसांनी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ महामार्गावरील वाहतुक रोखली होती. तसेच रामवाडी परिसरातील नारिकांनी देखील मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.