नगर – सावेडीतील श्रीश्रमिक बालाजी मंदिर स्थापनेला या वर्षी 26 वर्ष होत आहेत, वार्षिक ब्रम्होत्सवा निमित्ताने श्री व्यकंटेश्वरकल्याणम सोहळा अंतर्गत दि.6 ते 10 ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे. व्यंक्टरमणा गोविंदाच्या जयघोषात उत्सव मूर्ती ची मिरवणूक गांधी मैदान, कापडबाजार, दिल्ली गेट, चितळे रोड, तेली खुंट, प्रोफेसर कॉलनी, श्रमिक नगर काढण्यात आली होती.
शरद क्यादर व अम्मा साडीचे चंद्रकांत गुंडू यांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सकाळी दिप आराधना,ध्वजारोहण,विष्णु सहस्त्रनाम,कलश स्थापना व विनायक पुजन, आदी धार्मिक विधी झाले.सांयकाळी दिल्लीगेट तसेच श्रमिकनगर येथे संध्याआरती झाली.
ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले पदनादम ढोलपथकाने पारंपरिक ढोल आकर्षण होते श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ सहभागी झाले होते व नाशिक चे मंळगंगा देवीचे बॅंड पथक सहभागी होते बुधवारी सायंकाळी भाविकांनी देवाला क्षौर अर्पण केले. शुक्रवारी प्रभू बालाजी व देवी लक्ष्मी-पद्मावतीना हळदी लावण्याचा समारंभ होईल. तसेच या सोहळ्यांतर्गत प्रभू बालाजी व देवी लक्ष्मी-पद्मावतीचा विवाह व त्या बरोबर सव्वा रुपयात सामुदायिक विवाह सोहळा शनिवारी (दि.10) रोजी दुपारी 1.25 वाजता होणार आहे.