माउंट मैंगनुई (न्यूझीलंड) – न्यूझीलंड आणि इंग्लंड संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरूवारपासून सुरू झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पहिल्या दिवसअखेर ४ बाद २४१ धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
A solid day’s work as we close on 241/4 at Bay Oval.
Scorecard: https://t.co/irisa2uxvr#NZvENG pic.twitter.com/35gIvYPUpz
— England Cricket (@englandcricket) November 21, 2019
इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली, पण न्यूझीलंडच्या काॅलिन डी ग्रैंडहोमने डोमिनिक सिबलीला २२ धावांवर झेलबाद करत इंग्लंडला पहिला झटका केला. त्यानंतर राॅरी बर्न्स आणि जो डेनली यांनी इंग्लंडचा डाव सावरला. राॅ़री बर्न्सने ५२ तर जो डेनलीने ७४ धावा केल्या. जो रूट केवळ २ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या बेन स्टोक्सने अर्धशतक झळकावत संघाची धावसंख्या २०० पार नेली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बेन स्टोक्स नाबाद ७४ आणि आॅली पोप नाबाद १८ धावांवर खेळत होते.न्यूझीलंडकडून काॅलिन डी ग्रैंडहोमने सर्वाधिक २ तर टिम साउदी आणि नील वैगनरने पत्येकी १ गडी बाद केला.