मुंबई – अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. न्यासा आपल्या मित्रांसोबत बॉलिवूड पार्टीनमध्ये दिसून येते. स्टार कीड्सची एकही पार्टी ती कधीच सोडत नाही. आताही तसाच काहीस झालं आहे. न्यासा आपल्या नेहमीच्या मित्रांसोबत पार्टीमध्ये दिसली आणि तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
न्यासा तिचा जवळचा मित्र ओरहान अवत्रामणी उर्फ ओरीसोबत पार्टी करताना दिसली. ऑरीने न्यासासोबतचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे. अजय देवगण आणि काजोलच्या मुलीचे फोटो पाहून चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
न्यासा देवगन गेल्या महिन्यात 20 वर्षांची झाली, ज्यामुळे तिचे पालक म्हणजे काजोल आणि अजय देवगण यांनी मुलीसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यांनी काही खास फोटोही शेअर केले होते. स्टार किड अनेकदा भारतात किंवा परदेशात पार्टी आणि व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतात.मात्र सर्व स्टार किड्समध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे अनेकदा त्यांच्यासोबत ऑरी दिसून येतो.
View this post on Instagram
ऑरीने शेअर केलेले हे फोटो लंडनमधील एका क्लबमधील आहेत, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार किड्स पार्टी करताना दिसत आहेत.न्यासाने सिंगापूरच्या ग्लियन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. एका मुलाखतीमध्ये काजीलाने तिच्या सिनेसृष्टीत येण्याबाबत देखील भाष्य केले होते.