बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा – नुसरत

हैदराबाद – उन्नावमधील बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याच्या घटनेमुळे आणि हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनांनंतर सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांनी, क्रीडा पटूंपासून ते मनोरंजन विश्वातील अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाॅं यांनी गुन्हा सिद्ध झाल्यावर बलात्काऱ्यांना महिन्याभरातच फासावर लटकावण्यात याव, असा सल्ला दिला आहे.

जहाॅं यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात की ‘नाही म्हणजे नाहीच. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांनी जबाबदारीने वागायला हवे. जामीन नको. माफी नको. दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा’ अस त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.