मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री क्रीति सेनॉन हिने चित्रपट जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच तिची बहिण नुपुर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहेत. नुपुरने यापूर्वी काही म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. त्याचबारोबर अभिनेता अक्षय कुमारसोबत दोन म्युझिक व्हिडिओ ‘फिलहाल 1’ आणि ‘फिलहाल 2’मध्येही नुपुरने काम केले होते.
नुपुर पंजाबी चित्रपट ‘काला शाह काला’च्या हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाला सध्या ‘नुरानी चेहरा’ हे नाव देण्यात आले आहे. या दरम्यान तर नवाजुद्दीन सिद्दीकीचे अनेक चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत. यात ‘नो लँड्स मॅन’, ‘बोले चूडियाँ’, ‘जोगीरा सारा रा रा’, ‘हीरोपंती 2’ आणि ‘टिकू वेड्स शेरू’ सामील आहे.