मुंबई – ‘बालिका वधू’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. असंख्य मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेल्या विक्रांतची सोशल मीडियावर कायमच चर्चा होत असते.
विक्रांत मेसीने सोमवारी (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन डेला त्याची गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत लग्न केले आहे. विक्रांत आणि शीतलच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र उपस्थित होते. विक्रांत आणि शीतलने अगदी गुपचूप लग्न केले.
दरम्यान,विक्रांत आणि शीतल २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता २०२२ मध्ये ही जोडी लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या विक्रांत त्याच्या गॅसलाइट या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ते लग्न करणार आहेत. विक्रांत अनेक मालिकांसह लुटेरा, छपाक, हसीन दिलरुबा यासारख्या बॉलिवूडपटात झळकला आहे.