मुंबई – बॅंकांचे एनपीए पुढील सहा महिन्यांत साडेबारा टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटल्यामुळे सोमवारी बॅंकांच्या शेअरची विक्री होऊन निर्देशांक घसरले.
आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, स्टेट बॅंक इत्यादी बॅंकांचे शेअर आज सव्वासहा टक्केपर्यंत कोसळले. त्यामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 194 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी कमी होऊन 37,934 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 62 अंकांनी कमी होऊन 11,101 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी त्यांच्याकडील शेअर विकले. त्याचाही परिणाम या बॅंकेच्या शेअरच्या मूल्यावर झाला.