नारायणगाव – वाढदिवसाला बेकायदेशीररित्या डीजे वाजविणाऱ्या डीजे चालकावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काही मित्रांनी मोठेपणाने वाढदिवसानिमित्त तलवार भेट दिली. त्या तलवारीने केक कापल्याने एका युवकाला हे प्रकरण अंगलट आले आहे.
विघ्नहर निवृत्ती काळे (वय 29, रा. बोरी खुर्द, साळवाडी, ता. जुन्नर) असे डीजे चालकाचे नाव आहे. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल योगेश दामोदर गारगोटे यांनी दिली. साळवाडी येथील रोहन बेल्हेकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रात्री तलवारीने केक कापून मोठ्या आवाजात डीजे लावून धांगडधिंगा घातल्याने गुन्हा दाखल केला आहे.
युवा नेत्यांनी भान ठेवावे
वाढदिवस साजरा करताना तलवार या हत्याराने केक कापल्याने 3 मार्चला रोहन अनिल बेल्हेकर याच्यावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जुन्नर तालुक्यातील युवा नेते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा आहे.