विद्युत शवदाहिनी उपलब्धता समजण्यासाठी आता ‘डॅशबोर्ड’

शीतपेटी, शववाहिकांची संख्या वाढवली

पुणे – करोना बाधित मृतांसाठी स्मशाभूमींमधील विद्युत दाहिनीची उपलब्धता समजण्यासाठी आता स्वतंत्र ‘डॅशबोर्ड’ तयार करण्यात येणार आहे. यामुळे दहनासाठी कमीतकमी वेळ कोठे लागू शकतो, याची माहिती संबंधितांना मिळू शकणार आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी याविषयी माहिती दिली.

 

रुग्णावाहिका तातडीने उपलब्ध होण्यासाठी ‘शीतपेटी’ वाढवल्या आहेत. मात्र आता शीतपेटीमध्ये किती मृतदेह आहेत, विद्युत दाहिनींमध्ये किती मृतदेह आहेत आणि काही ऍम्ब्युलन्सेस वेटिंगमध्ये आहेत का, याविषयीची माहिती या माध्यमातून मिळू शकते. ऑनलाइन पास देण्याची व्यवस्था आहेच. त्याबरोबर हा “डॅशबोर्ड’ असेल, तर मृतकांच्या नातेवाईकांना कोणत्या स्मशानभूमीत जायचे याचा निर्णय तेथे घेता येऊ शकेल आणि त्यांचा वेळही वाचू शकेल. सध्या 14 शववाहिका आहेत. आणखी 6 शववाहिकांची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यांची उपलब्धताही डॅशबोर्डवर पाहता येईल.

…तर तक्रार करा

करोना काळात अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अडवणूक करून पैसे घेतल्याची तक्रार आली किंवा तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय ऍम्ब्युलन्स चालकांनीही पैसे मागितल्यास 108 क्रमांकाच्या हेल्पलाइनवर तक्रार करा असे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.

ऍम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध होण्याचे नियोजन

108 क्रमांकाची ऍम्ब्युलन्स सेवा उत्तम आहे. ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडे जीपीएस सेवा चांगली आहे. महापालिका आणखी ऍम्ब्युलन्स घेत आहे तर या सिस्टिमच्या माध्यमातून या सेवेचे नियोजन करता येऊ शकते, असे डॉ. खेमनार म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.