मंत्री महाजन, आ. राजळे, खा. डॉ. विखे पाटील, आ. कर्डिले यांची उपस्थिती
कर्जत – कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.
खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी खा. दिलीप गांधी, आ.शिवाजी कर्डिले, शंकर शिंदे, भामाबाई शिंदे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, आशा शिंदे, भामाबाई राऊत, नीता कचरे, साधना कदम, शांतिलाल कोपनर, अंबादास पिसाळ, कांतिलाल घोडके, बापूसाहेब नेटके, बळीराम यादव, पप्पू शहाणे, अशोक खेडकर, धनराज कोपनर, राजेंद्र देशमुख, विक्रमसिंह राजेभोसले, महेंद्र मोहळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी खा. गांधी, आ. कर्डिले, खा. डॉ. विखे पाटील, अंबादास पिसाळ, राऊत, राहुल जामदार, समीर जगताप, सुभाष जायभाय, अमजद पठाण, सुभाष आव्हाड, बाळासाहेब शिंदे, अल्लाउद्दीन काझी, दादासाहेब सोनमाळी, प्रशांत बुद्धिवंत, भगवान मुरूमकर, देविदास धस आदी मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन दादा शिंदे यांनी केले.
पवारांना आमच्या एवढे कोणी ओळखत नाही ः खा. विखे
मी जेवढे ओळखतो तेवढे पवारांना राज्यात कोणी ओळखत नाही. त्यांच्या विरोधात आम्ही कायम संघर्ष केला. कुणाला घाबरलो नाही. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला, ते जेलमध्ये जाणारच आहेत. माझे लाड पुरवायला कर्जत-जामखेडची जनता खंबीर आहे. सरकार आपले येणार आहे, मग पालकमंत्रीही आपलाच पाहिजे, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
जनतेसाठी दहा वर्षे साल घातले : राम शिंदे
माझे आई-वडील अशिक्षित असल्याने ते कार्यक्रमाला येत नाहीत. पण आज ते मला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. कर्जत जामखेडच्या जनतेने सालकऱ्याच्या मुलाला आमदार गेले. दहा वर्षे श्रद्धा व निष्ठा ठेवून काम केले. शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळवून दिले. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी पुढे कायदा करू. जे खाते मिळाले, त्यातून मतदारसंघातील जनतेला लाभ दिला. त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्याल, असे ना. शिंदे यावेळी म्हणाले.