भारत नव्हे; ऑस्ट्रेलिया आता पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली  – पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाने हक्‍क सांगितला आहे. आता गुणांच्या टक्‍केवारीनुसारच अंतिम फेरीतील दोन संघांची निवड केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी गुणांच्या टक्‍केवारीचा पर्याय स्वीकारला असून क्रिकेट समितीने सुचवलेली ही शिफारस आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केली आहे. 

करोना साथीमुळे अनेक सामने रद्द झाले तर काही पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे रद्द झालेल्या सामन्यांसाठी गुणांची टक्‍केवारीची पद्धत निवडण्यात आली.

नव्या गुणपद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाने अग्रस्थानी मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाची गुणांची टक्‍केवारी 0.822 इतकी असून भारताची 0.75 इतकी आहे. क्रिकेट समिती आणि मुख्य कार्यकारी समितीने पूर्ण झालेले सामने आणि आपल्या कामगिरीनुसार कमावलेले गुण यानुसार गुणपद्धतीला पाठिंबा दर्शवला आहे. काही संघांना आपली चूक नसतानाही सामन्यात खेळता आलेले नाही, अशा संघांवर अन्याय होऊ नये, याकडेही लक्ष देण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.