नवी दिल्ली – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उनहे पुढील वर्षी आणखीन ३ टेहळणी उपग्रह अवकाशांध्ये सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीच्या हवाल्याने एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर कोरियाने गेल्याच महिन्यात आपला पहिला लष्करी टेहळणी उपग्रह .शस्वीपणे प्रक्षेपित केला आहे. त्या पार्श्वभुमीवर आता आणखीन ३ उपग्रहांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे.
किम यांनी सत्तारुढ वर्कर्स पार्टीची ५ दिवसांची वार्षिक परिषद आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान त्यांनी आणखीन ३ टेहळणी उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
टेहळणी उपग्रह अवकाशात सोडण्याचे दोन प्रयत्न यापूर्वी अपयशी झाले होते. मा६ चीनच्या मदतीने तिसरा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुले किम यांचा आत्मविश्वास आमखीनच वाढला आहे.
आण्विक क्षमता वाढवणार
पुढील वर्षी देशाची आण्विक क्षमता अधिक वाढवण्याचे उद्दिष्टही किम यांनीठेवले आहे. अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रांची नवीन मालिका पुढील वर्षी विकसित केली जाईल, असेही किम यांनी सूतोवाच केले आहे. दक्षिण कोरियाबरोबरचे ताणलेले संबंध यापुढच्या काळातही अदिकच ताणले जाण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्६ंबाबत जपाननेही यापूर्वी चिंता व्यक्तकेली होती.