दिलबर आणि साकी साकी यासारखी चार्ट बस्टर्स दिल्यानंतर नोरा फतेहीने आपल्या नवीन गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
तिचे हे गाणे आगामी स्ट्रीट डान्सर 3डी चित्रपटातील असून गर्मी असे या गाण्याचे शिर्षक आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून या गाण्याला 24 तासांच्या आतच 30 मिलियन प्रेक्षकांनी पाहिले आहे.
यामुळे नोराही खूपच एक्साइटेड झाली आहे. एका कार्यक्रमाच्या मुलाखतीत नोरा म्हणाली, या लेटेस्ट गाण्याने म्ाझ्या यापूर्वीच्या सर्व गाण्यांचे रेकॉर्ड तोडले आहे. यामुळे मी खूपच उत्साहित आहे. माझ्या साकी-साकी आणि दिलबर या गाण्यांचेही विक्रम गर्मीने मोडीत काढले आहेत.
या गाण्याला यूट्यूबवर 24 तासांमध्येच 30 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या गाण्याला मिळत असलेला रिस्पॉन्स पाहून खूपच खूष आहे. यामुळे मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळत आहे, असे नोरा म्हणाली.
दरम्यान, इंस्टाग्रामवरही नोरा फतेहीने आपल्या भावना व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने गाण्याला पसंती दर्शविल्याने सर्वांचे आभार मानले आहे.