मुंबई- बॉलीवूडची दिलबर गर्ल नोरा फतेही तिच्या डान्सने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तिच्यापेक्षा तिच्या डान्सचे चाहते जास्त आहे. नवनवीन डान्सचे प्रयोग ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
नुकताच ती ‘नाच मेरी रानी या गाण्यावर थिरकताना दिसली. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. तिचा एक व्हीडियो यू-ट्यूबवर प्रचंड प्रमाणात बघितला जातो आहे. त्यात ती गुरु रंधावा आणि कोरियोग्राफर आदिल खान सोबत धम्माल करताना दिसत आहे. 23 ऑक्टोबरला हा व्हीडियो यू-ट्यूबवर रिलीझ करण्यात आला होता. त्यानंतर आतापर्यंत तो व्हीडियो 50 मिलियन पेक्षा अधिक चाहत्यांनी पाहिला आहे.
नोरा आणि गुरु रंधावा यांची धम्माल या गाण्यात दिसते आहे. यांची जोडी चाहत्यांना नेहमीच आवडीची राहिली आहे. नोराच्या प्रत्येक चित्रपटात तिचं स्पेशल गाणं असते. ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात ती झळकणार आहे. या आधी तिच्या ‘दिलबर’, ‘कमरिया’, ‘साकी-साकी’या गाण्याने चाहत्यांमध्ये धुमाकुळ घातला होता.