बॉलीवूडमधील डान्स क्वीन नोरा फतेहीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यावेळी नोराने करिना कपूरच्या प्रसिद्ध “फेविकॉल’च्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. याप्रसंगी नोरा ही एकटीच डान्स करत नसून तिच्यासोबत गायिका तुलसी कुमारदेखील डान्स करताना दिसतेय.
नोरा फतेही आपल्या डान्समुळे सतत चर्चेत असते, परंतु एक काळ असा होता जेव्हा शाळेत तिच्या डान्सवर तिच्या मैत्रिणी तिची चेष्टा करत असत. मात्र, नोराने खूप मेहनत घेत हे दाखवून दिले की कोणतीही गोष्ट तिच्यासाठी अशक्य नाही.
नोरा फतेही नुकतीच करीना कपूरच्या चॅट शोमध्ये झळकली होती. यात तिने आपल्या करियरच्या सुरुवातीला कास्टिंग डायरेक्टरकडून मिळालेल्या गैरवर्तणूकीबाबत सांगितले होते. नोरा म्हणाली होती की, एका महिला कास्टिंग डायरेक्टरने आपल्या घरी बोलवित तिला खूप सुनाविले होते.
तिच्यामध्ये कोणतेही टॅलेंट नसून इंडस्ट्रीमध्ये तिच्यासारखे हजारो जण असल्याचे ती म्हणाली होती. यानंतर नोरा खूपच रडली होती. मात्र, तिने ही गोष्ट पॉझिटिव्ह घेत खूप मेहनत घेतली.
दरम्यान, नोरा फतेहीचा सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी रि-पोस्ट केला असून त्यावर असंख्य कमेंट्स येत आहेत.