वाठार स्टेशन – वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होत असून जाहीर प्रचाराची सांगता बुधवारी सायंकाळी 5 वाजता झाली. मतदान प्रक्रियेवेळी संबंधित गावांमध्ये अनुचित प्रकार घडू नये, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी व आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी सपोनि स्वप्निल घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बुधवारी वाठार स्टेशनमध्ये बाजार चौकातून “रूट मार्च’ काढला.
वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवडणूक असलेल्या संवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी संचलन केले. या संचलनात पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.
दरम्यानण ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. आचारसंहितेचे पालन करावे, मतदान भयमुक्त वातारवणात व पारदर्शक पद्धतीने व्हावे. वादावादीचे प्रसंग टाळावेत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा घोंगडे यांनी दिला.