पुणे- बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज दहावीचा निकाल जाहीर होणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीच्या बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल माध्यमांमध्ये दहावीच्या निकालाबाबत जो मेसेज फिरतोय तो चुकीचा आहे, त्यावर विश्वास ठेवू नये. दहावीच्या निकालाची तारीख बोर्डाने अजून जाहीर केली नाही. निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल.”, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी वृत्तमाध्यमांना दिली. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. हे लक्षात घेता 6 ते 8 जून दरम्यान निकाल लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. यामुळे सोशल माध्यमांमध्ये आज निकाल जाहीर होणार आहे असा मेसेज वायरल होत होता. मात्र याबाबत माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्टीकरण देत आज दहावीच्या परिक्षेचा निकाल होणार नसल्याचे सांगितले आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या बेवसाइटवर लागला होता. त्याप्रमाणे 10 वीचा निकालसुद्धा दुपारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.