जमिनीखालील जलसाठे होणार पुनरुज्जीवित

गेरा डेव्हलपमेंटसतर्फे खराडीमध्ये 200 रिचार्ज बोअर वेल्स

पुणे – पुणे महापालिकेच्या सहकार्याने पावसाळी जलवाहिन्या (स्टॉर्म वॉटर) ड्रेनेज नेटवर्क चेंबर्सच्या माध्यमातून भूमिगत जलसाठ्यांना रिचार्ज करून पाणीसाठे पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. “गेरा डेव्हलपमेंट्‌स’तर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

गेरा डेव्हलपमेंट्‌स प्रा. लि.ने रिअल इस्टेट व्यवसायातील आपला 48 वर्षांहून अधिक काळाचा वारसा आणि पुणे, गोवा आणि बंगळुरूतील प्रीमिअम निवासी, व्यावसायिक प्रकल्पांचे पुरस्कार विजेते निर्माते ही ओळख जपत आहे. सामाजिक सहभागाचा वाटा उचलत त्यांनी भूगर्भातील जल फेरभरणामध्ये मोलाची कामगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच उपक्रमातून यंदा पावसाळ्यापूर्वी खराडी येथील पुणे महापालिकेच्या पावसाळी जलवाहिन्याच्या चेंबर्समध्ये 200 रिचार्ज बोअरवेल खोदण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. काम सुरू झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन महापौर मुक्‍ता टिळक आणि अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत झाले.

“वाढत्या शहरीकरणाने जमिनीत पाणी मुरून त्याचे साठे तयार होतील, असा भूभागच कमी होत आहे आणि त्यामुळे जलसाठ्यांमध्ये भर पडत नाही. पुण्यातील भूजल साठ्यांची पातळी 6.62 टीएमसी (हजार दशलक्ष घन फूट) इतकी नीचांकाला पोहोचली आहे. एक कॉर्पोरेट नागरिक म्हणून आमचीसुद्धा ही जबाबदारी आहे की, आम्ही या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापलिकेला सहकार्य करावे,’ अशी भावना “गेरा डेव्हलपमेंट्‌स’चे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी व्यक्‍त केली.

“एक डेव्हलपर कंपनी म्हणून आमच्याकडे क्षमता आहेत, ज्ञान आहे आणि या प्रश्‍नांसंदर्भात पुढे येऊन सहकार्य करावे, अशी संसाधने आहेत. यातून आम्ही पुणेकरांच्या आयुष्यावर एक दीर्घकालीन परिणाम करू शकतो. फक्‍त आमच्या ग्राहकांसाठीच नाही तर व्यापक प्रमाणावर समाजासाठीही आम्ही राखलेला “लेट्‌स आऊट डू’ (काही अधिक करणे) हा दृष्टीकोनच या उपक्रमाच्या मुळाशी आहे,’ असेही गेरा म्हणाले.

प्रकल्पावर अंदाजे 50 लाख खर्च
“पर्जन्यजल वाहून नेणाऱ्या पावसाळी जलवाहिन्या (स्टॉर्म वॉटर) ड्रेनच्या चेंबर्समध्ये या रिचार्ज बोअरवेल बसवल्या जातील. कॉंक्रिटच्या पृष्ठभागावर पडणारे पावसाचे पाणी स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन्समधून पुढे नदीत आणि तिथून शहरातून बाहेर पडते. कठीण पृष्ठभागावर पडून पावसाळी जलवाहिन्या (स्टॉर्म वॉटर) ड्रेन्सच्या माध्यमातून वाहून जाणारे पर्जन्यजल साठवले जावे, असा प्रयत्न यामागे आहे. मुख्य नगररोड (ग्रीन्सविले एव्हेन्यू रोड) ते खराडी गाव चौक आणि पार्क व्ह्यू रोड ते ढोले पाटील कॉलेज रोड अशा तीन किमीच्या पट्ट्यात या रिचार्ज बोअरवेल बसवण्यात येणार आहेत. या रिचार्ज बोअरवेल भूजल साठ्याखाली 60 फूट लावण्याची योजना मांडली होती. मात्र, जीएसडीए (ग्राऊंडवॉटर सर्व्हे ऍन्ड डेव्हलपमेंट एजन्सी)ने या स्थळांना भेट दिली आणि भौगोलिक सर्वेक्षणाचा अहवाल अभ्यासल्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या. त्या आम्ही ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त होत्या तरीही आम्ही हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. आता या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 50 लाख आहे,’ असे गेरा यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.