नवी दिल्ली: चीनशी सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्रालयाने चीनकडून ऊर्जा उपकरणांची आयात करायची नाही, असा निर्णय घेतला आहे अशी माहिती ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिली.
विविध राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांबरोबर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही राज्यांच्या वित्त वितरण कंपन्यांनीही चीनला या उपकरणांच्या आयातीच्या ऑर्डर्स देऊ नयेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
ते म्हणाले की, भारतात दरवर्षी 71 हजार कोटी रुपयांच्या वीज उपकरणांची आयात केली जात होती, त्यातील 21 हजार कोटी रुपयांची आयात चीनकडून केली जात होती. चीन आणि पाकिस्तानकडून आम्ही आता काहीही घेणार नाही असे मंत्री म्हणाले. भारतातच या साऱ्या उपकरणांची निर्मिती करणे शक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.