भारतीय समाज पार्टीशी आघाडीबाबत चर्चा नाही – संजयसिंह

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या पक्षाशी सध्या आमची राजकीय आघाडीची चर्चा झालेली नाही असे आम आदमी पक्षाचे उत्तर प्रदेशचे निमंत्रक संजयसिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

आपण आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेणार असून राजकीय आघाडीबाबत चर्चा करणार आहोत असे एसबीएसपीचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी म्हटले होते. 

तथापि ते खोटे बोलत आहेत आम्ही त्यांच्याशी कोणतीही आघाडी करणार नाही, असेही संजयसिंह यांनी स्पष्ट केले आहे. केजरीवाल आणि राजभर यांची या आधीही कोणती चर्चा झालेली नाही आणि यापुढेही ती नियोजित नाही असे संजयसिंह म्हणाले. 

आम्ही केजरीवालांना 17 जुलैला भेटणार आहोत, असे राजभर यांनी सांगितले होते. त्यावर संजयसिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.