नवी दिल्ली – उर्दू ही जगभरात बोलल्या जाणाऱ्या सर्वात सुंदर भाषांमधील एक आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज उर्दू भाषेच्या समृद्धीचा उल्लेख केला. मातृभाषेचे महत्त्व लक्षात घेत त्यांनी लोकांना त्यांच्या मातृभाषेतूनच नेहमी बोलण्याचे आवाहन केले.
विशेषतः हैदराबाद आणि संपूर्ण डेक्कन ही उर्दूची प्राचीन केंद्रे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ पत्रकार श्री.जे.एस. इफ्तेखार लिखित ‘उर्दू कवी व लेखक – जेम्स ऑफ डेक्कन’ हे पुस्तक देण्यात आले.
त्यांना तेलंगण राज्य भाषा व संस्कृती विभाग संचालक श्री ममीदी हरिकृष्ण यांच्याकडून माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या जीवनावरील पुस्तके तसेच “सत्यकासी भार्गव लिखित” मानवोत्तम रामा ‘आणि श्री मल्लिकार्जुन लिखित” नालागोंडा कथलु’ ही पुस्तके नायडू यांना भेट देण्यात आली.
“जेम्स ऑफ़ डेक्कन’ हा गद्य आणि पद्य संग्रह आहे ज्यात डेक्कन प्रांतातील 51 उल्लेखनीय कवी आणि लेखकांचे जीवन आणि कार्य विशद केले आहे. या पुस्तकात हैदराबादचा संस्थापक मुहम्मद कुली कुतुब शहा यांच्या काळापासून सध्याच्या काळापर्यंत डेक्कनच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा यांची ओळख करून देण्यात आली आहे.