राजगुरुनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावावर आज बुधवारी पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सभापती भगवान पोखरकर हे या विशेष सभेला गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेच्या सदस्यांना अविश्वासाच्या विशेष सभेस हजर राहून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करावे असा पक्षादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिले आहेत. यामुळे पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य ठरावाच्या बाजूने जाणार कि विरुद्ध बाजूने जाणार या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर हे न्यायालयीन कोठडीत असल्याने ते अविश्वास ठरावाच्या सभेस उपस्थित राहिले नाहीत.उर्वरित शिवसेनेचे सात सदस्य, राष्ट्रवादीचे चार, भाजप, काँग्रेस प्रत्येकी एक असे १३ सदस्य या सभेस हजर राहिले असून अविश्वास सभा पिठासन अधिकारी तथा प्रांत विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.