नेवासा: राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असून, भाजप आणि शिवसेना हे दोणाही पक्ष आपापले संख्याबळ वाढवतना दिसत आहेत. त्याचतच नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघाचे नवनियुक्त आमदार शंकरराव गडाख यांनी विखेंना हात दाखवून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती तर या मतदार संघात राष्ट्रवादीने त्यांना समर्थन दिले होते.
गडाख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात रंगली होती. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे जाणीव गडाख हे सोबतच मुंबईला गेल्याची माहिती समोर आल्याने गडाख भाजपात जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु आता गडाख यांनी सेनेत प्रवेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गडाख हे दोन दिवसांपासून मुंबईला गेले असून अद्याप त्यांच्या सेनेतीळ प्रवेशाबाबात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु गडाख यांच्या सोनाई गावात कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे झेंडे घेऊन मिरवणुईक काढल्याचे फोटो व्हायरल झाले असल्याने त्यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याचे बोलले जात आहे.