मुंबई – ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांनी आज वयाच्या ९८ व्या वर्षी जगाला निरोप दिला आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होेते. दरम्यान त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात जुहू येथील दफनभूमीत दफन करण्यात आले.
Wish he had gone to late Swapnil Lonkar’s mother..
who died because of Maha Gov s failure..
He didn’t have the time to go there.. but had all the time to go here..
sad but true!!! pic.twitter.com/u6NCuQdnWZ— nitesh rane (@NiteshNRane) July 7, 2021
दरम्यान दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी राजकीय नेतेही त्यांच्या घरी पोहोचले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे, ‘ठाकरे सरकारला स्वःताच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या पालकांना भेटायला वेळ नाही मात्र, येथे जाण्यासाठी वेळ आहे. दुख:द पण सत्य’ असं म्हणत सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.