शिमला – हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते वीरभद्र सिंह यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमई ते ८७ वर्षाचे होते. आज पहाटे 4 वाजता मल्टी ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन महिन्यापासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते.
Himachal Pradesh | Former Himachal Pradesh Chief Minister & Congress leader Virbhadra Singh passes away at 87 after battling with prolonged illness in early hours of the day: Medical Superintendent Dr Janak Raj, Indira Gandhi Medical College and Hospital, Shimla
(File pic) pic.twitter.com/xPnGrpYfSI
— ANI (@ANI) July 7, 2021
वीरभद्र सिंग यांच्यावर शिमल्याच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांनी दोनवेळा कोरोनावर मात केली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला.
वीरभद्र सिंह यांचा जन्म 23 जून 1934 रोजी राज घराण्यात झाला होता. त्यांचे वडील राजा पद्मसिंह हे बुशर रियासतचे राजा होते. वीरभद्र सिंह हे नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवाय सहा वेळा ते मुख्यमंत्री बनले होते. यूपीए सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविले होते. त्यांनी केंद्रात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळलं होते. सध्या ते सोलन जिल्ह्यातील अरकी येथील आमदार होते.
मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात 28 मे 2009 केंद्रीय मंत्री देखील होते. ते पहिल्यांदा १९८३ मध्ये मुख्यमंत्री बनले होते. सलग दोन वेळा ते १९९० पर्यंत या पदावर होते. यानंतर १९९३ ते १९९८, २००३ ते २००७ आणि २०१२ ते २०१७ असे मुख्यमंत्री राहिले होते.
Sad to know that Shri Virbhadra Singh is no more. His political career spanning six decades in his roles as chief minister and parliamentarian was marked by his commitment to serve people of Himachal Pradesh. Condolences to family & followers.
— President of India (@rashtrapatibhvn) July 8, 2021
वीरभद्र सिंह यांच्या निधननानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. यासह अनेक राजकीय नेत्यांची त्यांना श्रद्धांजली वाहली आहे.