Nirmala Sitharaman – फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सने शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman ) यांच्यासह आणखी तीन भारतीय महिलांना स्थान दिले आहे. या तीन महिलांना व्यवसाय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
फोर्ब्सच्या जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत निर्मला सीतारामन 32व्या स्थानावर आहेत. निर्मला सीतारामन या मे 2019 मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री बनल्या आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.
या यादीत निर्मला सीतारामन यांच्यासह एचसीएल कॉर्पच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल आणि बायोकॉनचे संस्थापक किरण मुझुमदार शॉ यांचाही समावेश आहे.
दरम्यान, जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांना पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टीन लगार्डे आहेत. यानंतर तिसऱ्या सर्वात शक्तिशाली महिला भारतीय वंशाच्या अमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरिस आहेत.
एचसीएल सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा या फोर्ब्सच्या यादीत 60 व्या स्थानी आहेत. रोशनी नाडर या एचसीएलचे संस्थापक आणि उद्योगपती शिव नाडर यांची मुलही आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या सीईओ या नात्याने कंपनीच्या सर्व धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. जुलै 2020 मध्ये वडिलांनंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
सोमा मंडल या फोर्ब्सच्या यादीत 70 व्या स्थानी आहेत. त्या सरकारी मालकीच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) च्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. 2021 मध्ये त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे सोमा मंडल यांच्या नेतृत्वाखाली सेल सतत नफा मिळवत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाच्या पहिल्या वर्षात कंपनीच्या नफ्यात तीन पटीने वाढ झाली आहे.
किरण मुझुमदार-शॉ या फोर्ब्सच्या यादीत 76 व्या स्थानी आहेत. त्या भारतातील सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिलांपैकी एक आहे. बायोफार्मास्युटिकल फर्म बायोकॉनची स्थापना त्यांनी 1978 मध्ये केली होती.