निर्मला सीतारमन यांचा १०० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश   

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा ब्रिटन-भारताच्या संबंध सुदृढ बनविणाऱ्या १०० सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत ब्रिटनच्या वरिष्ठ कॅबिनेट मंत्री  पेनी मॉरडाउंट यांचेही नाव समाविष्ट आहे. ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जाविद यांनी भारतीय दिवसाच्या निमित्ताने संसदेत १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली.

भाजप नेता निर्मला सीतारमन भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये गणल्या जातात. त्यांनी द्विपक्षीय संबंध सुदृढ बनविण्याच्या दृष्टीने मोठे योगदान दिले आहे. यामुळे त्यांना यादीत स्थान मिळाले आहे. सीतारमन यांच्याकडे कॉर्पोरेट मंत्रालयही आहे. ब्रिटनच्या मिडिया हाऊस इंडिया इंक यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्या सीतारमणने पूर्वी यूकेमध्ये काम केले होते. त्यांच्या इतर सहकार्यांपेक्षा सीतारमन ब्रिटनला चांगल्या पद्धतीने समजतात.

या यादीत ब्रिटनचे संरक्षण मंत्री पेनी मॉरडाउंट यांचाही  समावेश आहे. याव्यतिरिक्त मूळ भारतीय खासदार प्रीती पटेल आणि बैरोनेस सैंडी वर्मा, भारतीय विधी कंपनीची प्रमुख जिओ मूडी आणि पल्लवी एस. श्रॉफ, चित्रपट निर्मात्या गुरिंदर चढा, अपोलो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक सुनीता रेड्डी आणि नास्कॉमची अध्यक्षा देवज्ञानी घोष या यादीत समाविष्ट आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)