अध्यक्षपदाचा राजीनामा देणारच – राहुल गांधी

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षातील जेष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यानंतर देखील काँग्रेस अध्यक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते.

याच पार्श्वभूमीवर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या 51 खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. तसेच युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला आहे. तसेच ‘देशाला राहुल गांधींची गरज आहे’ असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी राहुल गांधीना अध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी केली. मात्र राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केल आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.