Niranjan Hiranandani: अब्जाधीशांच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील. कोट्यवधींची संपत्ती असलेल्या श्रीमंत लोकांकडे महागड्या खाजगी जेट आणि जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा संग्रह असणे सामान्य आहे. मात्र, ज्यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती असतानाही प्रसिद्ध उद्योगपती हिरानंदानी मुंबईच्या लोकलने ऑफिसला जाताना दिसले.
रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत उद्योजक हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हिरानंदानी हे मुंबई लोकलने प्रवास करताना दिसत आहेत. हिरानंदानी मुंबई लोकलने उल्हासनगर येथील त्यांच्या कार्यालयात जात असतानाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
हिरानंदानी यांनी मुंबईच्या लोकलने प्रवास करताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हिरानंदानी यांची गणना देशातील अव्वल श्रीमंतांमध्ये केली जाते. 2023 च्या हुरुन यादीनुसार, निरंजन हिरानंदानी हे भारतातील 50 सर्वात श्रीमंत लोकांमध्ये होते. त्यांची एकूण संपत्ती 32 हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडे आलिशान कारचे कलेक्शनही आहे.
एखाद्या व्यक्तीकडे हजारो कोटी रुपयांची अफाट संपत्ती असेल, महागड्या गाड्यांचा अप्रतिम संग्रह असेल आणि तरीही ऑफिसला जाण्यासाठी मुंबईची लोकलने प्रवास केला तर लोकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. हिरानंदानी यांच्या प्रवासाचे कारण म्हणजे मुंबईची बदनाम वाहतूक. अनेक वेळा रस्त्यावर अडकून तासंतास वाया गेल्याने मुंबईची वाहतूक बदनाम झाली आहे. अशा परिस्थितीत हिरानंदानी यांनी वेळ वाचवण्यासाठी मुंबई लोकलने कार्यालयात जाणे पसंत केले.
स्वतः हिरानंदानी यांनी त्यांच्या या अनोख्या प्रवासाची झलक शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी हा अनुभव सांगितला आहे. व्हिडिओसोबत ते लिहितात – वेळेची बचत करत आणि वाहतूक कोंडीवर मात करत शहराच्या लाईफलाइनमधन एसी कोचने मुंबई ते उल्हासनगर प्रवास करणे हा एक इनसाइटफुल वैयक्तिक अनुभव होता.
दरम्यान, लाखो लोक दररोज मुंबई लोकलने कार्यालयात जातात. या कारणास्तव मुंबई लोकलला देशाच्या आर्थिक राजधानीची जीवनरेखा देखील म्हटले जाते.