कराड -कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी 24 करोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. “कृष्णा’मधून आत्तापर्यंत एकूण 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलने करोनमुक्तीचे 9 वे शतक पूर्ण करत करोनामुक्तीची घौडदौड सूरू ठेवली आहे.
शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये पाटण तालुक्यातील मारुल हवेली येथील 58 वर्षीय पुरुष, इस्लामपूर तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील 53 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील चोरे येथील 87 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 26 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय मुलगी, 3 वर्षीय मुलगा, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, ओंड येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 24 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 21 वर्षीय महिला, कराड येथील 69 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड येथील 27 वर्षीय पुरुष, गुहागर तालुक्यातील वेळनेश्वर भाटी येथील 65 वर्षीय पुरुष, कासेगाव येथील 21 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कोल्हापूर येथील 14 वर्षीय मुलगा, चिपळूण येथील 75 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.