अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास अनेकदा त्यांच्या फॅमिली टाईमचे फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असतात. या जोडप्याची कंपेटिबिलिटी चाहत्यांना खूप आवडते. आता प्रियंकाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
ज्यामध्ये निक जोनास प्रियांकाचा चालत्या कारमध्ये पोनीटेल उघडताना दिसत आहे. पिसी आणि निक यांना एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मनोरंजक आहे. अशात प्रियांकाची काळजी घेताना निक खूपच गोंडस दिसत आहे. यासोबतच प्रियांका चोप्राचे एक्सप्रेशन्सही खूप इंटरेस्टिंग आहेत.
निक अनेकदा प्रियांकावर प्रेम व्यक्त करताना दिसतो. आता अलीकडेच प्रियंकाने त्याची आणखी एक झलक सादर केली आहे. दरम्यान प्रियंकाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुरुवातीला निक टॉर्च घेऊन प्रियांकाच्या केसांकडे बघताना दिसत आहे. त्यानंतर तो तिचे पोनीटेल उघडतांना दिसत आहे. प्रियंका आणि निकची बॉडिंगचे चाहते कौतुक करत आहे
इंस्टाग्राम युजर्सना निकची ही स्टाईल आवडली आहे. अनेक चाहते या व्हिडिओव प्रतिक्रिया देत आहेत, तर अनेकजण कमेंट बॉक्समध्ये या जोडपयावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे कपल खूप क्यूट आहे.’ त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘मी प्रार्थना करतो की प्रत्येकाला निक जोनाससारखा नवरा मिळो.’ असं म्हणत या जोडप्याचे कौतुक केले जात आहे.