मुंबई – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच साध्या लुकमध्ये असते. मात्र याच साध्या लुकमधील साडीलुकसुद्धा प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे.
नुकतंच तिने साडीमध्ये क्लासिक फोटोशुट केलं असून, या सिंपल लुकमध्ये ती प्रचंड खुलून दिसत आहेत. खरंतर साडीलुकमध्ये ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे.
वयाची 50 वर्ष पार केल्यानंतरही ती तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली ऐश्वर्या तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेअर करत असते.
ऐश्वर्या साडीसोबतच अनेकदा वेस्टर्न लूकमध्येही फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला फॅन्स प्रचंड प्रेम देतात.
असंख्य मालिका, चित्रपटांमध्ये काम करून ‘ऐश्वर्या नारकर’ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. निखळ हास्य आणि मनमोहक अदा यांमुळे ऐश्वर्या चाहत्यांची मनं जिंकत आहे.