मुंबई – ‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘निया शर्मा’ छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया शर्माचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.
नियाने भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केले नसेल, पण तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. निया शर्मा तिच्या ग्लॅमर्स स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, व्हिडिओ आणि फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते आणि सेलिब्रिटी देखील अवाक होत असतात.
मात्र, पुन्हा एकदा असाच बोल्ड अंदाज दाखवण्याच्या नादात अभिनेत्री उप्स मोमेंटची शिकार झाली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नुकतंच अभिनेत्रीचा एका पार्टी दरम्याचा व्हिडिओ समोर आला असून, मध्ये तिने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केल्याचं दिसून आलं आहे.
मात्र, तिचा हा ड्रेस इतका ढिल्ला होता की चाहत्यांच्या नजरा एका जागी खिळून राहिल्या. नियाची बोल्ड स्टाईल पण काही चाहत्यांना ती आवडली नाही आणि कमेंट्समध्ये त्यांचा राग समोर आला.
एका युजरने लिहिले, “आधी कपडे घालण्याच्या पद्धती शिका…’ मग दुसऱ्याने लिहिले, ‘तू आता उर्फीचा रेकॉर्ड मोडशील…’ अश्या अनेक कमेंट नेटकरी तिच्या या व्हिडिओवर करताना दिसत आहेत.