Nia Sharma – ‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘निया शर्मा’ (Nia Sharma) छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया शर्माचे (Nia Sharma) नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.
नियाने भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केले नसेल, पण तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. निया शर्मा तिच्या ग्लॅमर्स स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, व्हिडिओ आणि फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते आणि सेलिब्रिटी देखील अवाक होत असतात.
दरम्यान, पुन्हा एकदा असाच बोल्ड अंदाज अभिनेत्रीने दाखवला आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये नियाचा मादक अवतार सर्वांना पाहायला मिळत आहे.
निया शर्मा ही सध्या विदेशात असून धमाल करताना दिसतंय. निया शर्मा ही दुबईमध्ये खास वेळ घालवताना दिसतंय. निया शर्मा हिने अत्यंत बोल्ड लूकमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले.
निया शर्मा हिने बाथटबमध्ये बसून खास फोटोशूट केले. यामध्ये अभिनेत्री कमालीची हॉट दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना निया शर्मा दिसते. निया शर्मा हिचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडल्याचे दिसतंय.